धारावीत कोरोनाचा चौथा रुग्ण आढळला; मुंबईसाठी धोक्याचा इशारा

मुंबई | धारावीत कोरोनाचा चौथा रुग्ण आढळल्याने मुंबईसाठी धोक्याचाच इशारा मानला जातो आहे. धारावी येथील बलिगा नगरमध्ये आणखी एक रुग्ण आढळला आहे. एका 30 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय.

दिल्लीच्या मरकजसाठी गेलेले पाचजण धारावीत गेले होते. ते पाचही जण धारावीत राहिले होते. ज्याच्या फ्लॅटमध्ये हे लोक राहिले त्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात आजच 47 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 43 जण हे मुंबई आणि ठाण्यातील आहेत. अशात आता धारावीत चौथा रुग्ण आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे.

धारावीत आलेले तबलीगी जमातचे पाच लोक नंतर केरळला गेले. त्यांच्या संपर्कात आलेल्या धारावीत राहणाऱ्या 59 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि त्याचा मृत्यूही झाला. आता याच बलिगा नगर येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे अशी माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-वारकऱ्यांचा स्तुत्य आदर्श; एका आवाहनावर चैत्री वारी करणं टाळलं!

-कोरोनाची लागण झालेल्या बाळाची नर्सकडून करमणूक; ‘सलाम या वीरांना’ म्हणत जयंत पाटलांनी केलं कौतुक

-…म्हणून मुख्यमंत्र्यांनी केलं सोलापूरच्या सात वर्षीय आराध्याचं कौतुक!

-परराज्यातील मजुरांना मुख्यमंत्र्यांचं अभय; दिली ही महत्त्वाची माहिती

-भाजपवाल्यांनो, मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच मरणार; जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर