पुणे महाराष्ट्र

दिलासादायक! पुण्यात 24 तासांत 5 जण कोरोनामुक्त, 48 तासांत एकही नवा रुग्ण नाही

पुणे | महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्याच्या नायडू रुग्णालयात आणखी तिघांची प्रकृती सुधारली असून त्यांनादेखील डिस्चार्ज देण्यात आला आहे.

या रुग्णांना डिस्चार्ज देण्याअगोदर एका दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आलं होतं. त्यानंतर तीन रुग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे नायडू रुग्णालयातून आज पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तीनही रुग्ण पहिल्या कोरोनामुक्त दाम्पत्याच्या सहवासातील आहेत. एक या दाम्पत्याची मुलगी, दुसरा या दाम्पत्याच्या टॅक्सीचा चालक आणि तिसरा यांचा सहप्रवासी आहे.

दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला आहे. एकूण 606 रुग्ण कोरोनाव्हायरसच्या विळख्यात आहे. त्यापैकी 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 122 रुग्ण आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

-ठाकरे सरकारच्या राज्यात पोलीस बेफाम, पत्रकाराला केली मारहाण

-मोदी सरकार 80 कोटी लोकांना 2 रूपये किलोने गहू आणि 3 रूपये किलोने तांदूळ देणार

-महाभारताचं युद्ध 18 दिवसांत जिंकलं, कोरोनाचं युद्ध 21 दिवसांत जिंकायचंय- नरेंद्र मोदी

-प्लीज पप्पा… बाहेर जाऊ नका बाहेर कोरोना आहे; लहानग्या चिमुकल्याची पोलिस बापाला आर्त साद

-बाहेरच्या लोकांनी गावात प्रवेश करु नये म्हणून गावकऱ्यांची नामी शक्कल