Loading...
नागपूर महाराष्ट्र

धक्कादायक… मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे आई-वडिल अन् भावाने केली आत्महत्या!

गडचिरोली | गडचिरोलीतील आनंद नगर येथील मुलीने पळून जाऊन लग्न केल्यामुळे तिच्या आई, वडील आणि भावाने आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे. रवींद्र वरगंटीवार, वैशाली रवींद्र वरगंटीवार आणि साहिल रवींद्र वरगंटीवार अशी आत्महत्या केलेल्या या तिघा जणांची नावं आहेत.

घरामागे असलेल्या विहिरीत उडी घेऊन या तिघांनीही आत्महत्या केली. सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Loading...

शनिवारी मुलीने आंतरजातीय विवाह केला. त्यानंतर या तिघांनीही आत्महत्या केली. उपलब्ध माहितीनुसार मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने मुलीच्या आई-वडिल आणि भावाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

एका शाळेत शिक्षिका असलेल्या मुलीने आपण प्रेमविवाह करणार असल्याची कल्पना दीड महिन्यापूर्वी घरी दिली होती. मात्र तिच्या घरुन या विवाहाला विरोध करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-आरक्षणाबाबत सुप्रिम कोर्टाने दिलेला निर्णय अनुसुचित जाती जमातींवर अन्याय करणारा- आठवले

-ती आपल्याला कायमचं सोडून गेली…; आनंद महिंद्रा यांचं ते ट्वीट व्हायरल

-आपल्या घरात ‘असा’ नराधम निर्माण होऊ देऊ नये हीच खरी श्रद्धांजली- अजित पवार

-प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अन् आरोपीला 1 महिन्यात फाशी द्या- नवनीत राणा

-बारामतीत होणार रणजी सामना; पवारांनी करून दाखवलंच!

Loading...