Top news

लॉकअपमधून बाहेर, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अरुण गवळीचा ‘कॅरम’गेम; पाहा व्हीडिओ

मुंबई | कोरोनामुळे संपूर्ण देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेशिवाय कुणालाही बाहेर पडण्यास मज्जाव आहे. यामुळे सर्वजण घरकाम करताना किंवा घरी कसा वेळ घालवत आहोत, याबाबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत आहेत.

कुख्यात गुंड अरुण गवळी सध्या पॅरोलवर असून, तो सध्या घरीच आहे. गँगस्टर गवळीच्या जावयाने सोशल मीडियावर ‘अरुण गवळी ’चा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरुण गवळी कुटुंबीयांसोबत कॅरम खेळताना दिसत आहे.

मुली गीता आणि योगितासोबत अरुण गवळी कॅरमवर हात आजमवताना दिसत आहे. हा व्हिडीओ योगिताचा पती अभिनेता अक्षय वाघमारेने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 27 फेब्रुवारीला पॅरोल मंजूर केला आहे. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

 

 

View this post on Instagram

 

Family time 🏠 #stayhome #staysafe #familytime . #daddy @cupidsillyshell @geetajay @twinkledustatmita @asha_arun_gawli_official_

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare) on

महत्वाच्या बातम्या –

-“महाराष्ट्रातील लॉकडाउनचा कालावधी ‘इतक्या’ दिवसांनी वाढवला जाऊ शकतो”

-एका विषाणूसमोर गुडखे टेकणाऱ्यांपैकी आपण नाही, आत्मविश्वासाने लढू आणि जिंकू- उद्धव ठाकरे

-मी माझ्या महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवेन पण तुम्हाला सोडणार नाही- उद्धव ठाकरे

-निवडणूक आयोगाचा आदेश जारी; महाविकास आघाडीचं सरकार संकटात!

-डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करा- अमित शहा