नाशिक महाराष्ट्र

“राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा, पण लोकहिताच्या कामाला स्थगिती देऊ नका”

जळगाव | भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ अशी परिस्थिती आहे, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे कृतज्ञता सत्कार सोहळा संभारभात ते बोलत होते. महाविकास आघाडी हे तीन पक्षांचं सरकार आहे. पण या सरकारमध्ये ताळमेळ नाही. कुणाचं काय चाललंय हे कळतंच नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

लोकहिताच्या कामाला विद्यमान सरकारने कुठेही स्थगिती देऊ नये. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करु. पण लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवतो, अशा ठिकाणी राजकारण करु नये, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं तीन पक्षाचं सरकार सत्तेत आलं आहे. तसेच सरकारनं 100 दिवस पूर्ण केले आहेत. मात्र, भाजप नेते या नव्या सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

-जसं आपणं पंढरपूर- शिर्डीला जातो, तसं उद्धव ठाकरे अयोध्येला जातात- सुप्रिया सुळे

-“मंदिर मशिदीच्या ऐवजी शाळेत फेऱ्या मारत जावा; बघा काय बदल होतो”

-“गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत; त्यांची सल्तनत नेस्तनाबूत करा”

-आम्ही 100 असलो तरी त्यांना पुरून उरतोय- सुप्रिया सुळे

-“जर एखादी जादू झाली आणि संघ परिवारातील सर्व स्वयंसेवक गायब झाले, तर…”