Loading...
औरंगाबाद महाराष्ट्र

औरंगाबादकरांनी सोडला सुटकेचा निश्वास, कारण ‘त्या’ महिलेनं केली सात दिवसात कोरोनावर मात

औरंगाबाद | कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या 59 वर्षीय प्राध्यापिक महिलेची उपचारानंतर चाचणी केली असता तिचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. संबंधित महिलेने सात दिवसात कोरोनावर मात केली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शहरात एकमेव कोरोनाग्रस्त असलेल्या प्राध्यापिकेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आता तिची प्रकृती स्थिर असून आम्ही केलेले उपचार यशस्वी ठरले. त्यामुळे सध्या शहरवासीयानांसोबत सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं.

Loading...

शहरातील एका संस्थेत प्राध्यापक असलेली महिला रशिया, कझाकिस्तान येथून जाऊन आली होती. त्यांच्यासोबत आणखी दोघीजण होत्या. त्यानंतर त्या शहरात आल्यावर त्यांचा अहवाल पाझिटीव्ह आला. त्यानंतर प्रशासनाकडून त्यांची तपसणी करण्यात आली.

दरम्यान, प्राध्यापिकेच्या संपर्कात आलेल्या 21विद्यार्थ्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे शहरातील स्थानिक नागरिकांनी डॉक्टरांचं कौतूक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-सावधान ! महाराष्ट्रात कोरोनाने घेतला दुसरा बळी

-“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प पुर्ण करुया, भारताला कोरोनापोसून वाचवूया”

-“विराट इतर खेळाडूंसारखा नौटंकी करत नाही, क्रिकेटप्रती त्याला आदर आहे”

-“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे ‘जनता कर्फ्यूचं’ आवाहन केलं आहे त्याला सगळ्यांनी 100 टक्के प्रतिसाद द्या”

-कोरोनाची लागण झाली कनिकाला, पण चिंता वाढली नेतेमंडळींची!

Loading...