सरकारी कर्मचाऱ्यांना जेवायला 2 तास आणि चहाला 1 तास…; 5 दिवसांच्या आठवडा राजू शेट्टींना पटेना!

कोल्हापूर |  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा करून ठाकरे सरकारने भेट दिली आहे. मात्र या निर्णयावर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यापोठापाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रमाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रशासकिय कामं खूप मागे पडतील, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. पगार दिवसेंदिवस वाढत चालला आहे तर काम कमी होत चाललं आहे. नेमकं कर्मचाऱ्यांच्या मनात आहे तरी काय? असं शेट्टी म्हणाले.

जरी सरकार म्हणत असेल की 5 दिवसांचा आठवडा केल्यानंतर 45 मिनिटांचा कालावधी दररोज वाढवणार आहे तरी लंच टाईमच्या नावाखाली सरकारी कर्मचारी 2-2 तास ऑफिसबाहेर भटकत असतात, हे अनेक वेळा मी पाहिलेलं आहे. फावल्या वेळेतली काम त्या वेळेत सरकारी कर्मचारी करत असतात. परत चहाच्या नावाखाली अर्धा एक तास ते जात असतात.. जरी 45 मिनिटे वाढवले तरी त्यांचा कामाला हात किती लागणार आहे हा प्रश्नच आहे, असं शेट्टी म्हणाले आहेत.

दुसरीकडे कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार कशासाठी? सरकारी कर्मचारी 2 दिवसांचं तरी काम करतात का हे अगोदर शासनाने तपासावं, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. 5 दिवसांचा आठवडा केल्याने सरकारी कर्मचारी आनंदित आहेत मात्र दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामावर सर्वसामान्यांना काही आक्षेप आहे आणि हेच आक्षेप कडू यांनी अधोरेकित केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-बाबांनो, सरकारला गोत्यात आणणारी वक्तव्य करू नका; उद्धव ठाकरेंचा सल्ला

-शेतकरी पुत्रांच्या लग्नासाठी राजू शेट्टी घेणार पुढाकार!

-…म्हणून देशातल्या कोणत्याही नेत्यांना केजरीवाल शपथविधीसाठी बोलावणार नाही!

-राजकीय पक्षांना न्यायालयाचा दणका; उमेदवारांवर गुन्हे दाखल असतील तर…

-भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांची वर्णी!