Loading...
देश

नवऱ्याला आवडली नाही नवरीची साडी म्हणून नवऱ्याने मोडली संसाराची घडी

बंगळुरू | कर्नाटकमध्ये एका लग्न समारंभात नवरीच्या साडीची क्वॉलिटी आवडली नसल्यामुळे नवरदेवाने लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कर्नाटकमधील हासन जिल्ह्यातील आहे. विशेष म्हणजे नवरदेवाने आपल्या आई-वडिलांच्या सूचनेवरून लग्न मोडले आणि लग्नाच्या एक दिवसआधी तो घरातून निघून गेला.

नवरीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नवऱ्याने आपल्या आई-वडिलांच्या सांगण्यानुसार हे कृत्य केलं  आहे, असा आरोप नवरीच्या कुटुंबियांनी केला आहे.

Loading...

रघुकुमार यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार आहे. रघुकुमारच्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, लग्नात नवरीसाठी जी साडी खरेदी करण्यात आली. त्या साडीवर नवरदेवाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे दोन्हा कुटुंबात वाद झाले.

महत्वाच्या बातम्या- 

-…तर ओबीसी समाजाने जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घ्यावी- नाना पटोले

-‘झोपु’च्या नव्या कार्यालयावरुन अजित पवारांची नाराजी!

-देशाचे पंतप्रधान गांधीजींसमोर नतमस्तक होतात पण…- जितेंन्द्र आव्हाड

-मनसेत इनकमिंग सुरू; दोन दिग्गज नेत्यांनी केला प्रवेश

-मी महाराष्ट्राची लेकय; घाबरणारही नाही आणि गप्पही बसणार नाही- मानसी नाईक

Loading...