नाशिक महाराष्ट्र

महाराज काळजी करू नका सर्व पैलवान तुमच्या मागे ठाम उभे आहेत- हर्षवर्धन सदगीर

नाशिक | ह.भ.प. इंदोरीकर महाराज देशमुख सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थनासाठी अनेक जण पुढे आले आहेत. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरसह नाशिकच्या पैलवानांनी इंदोरीकर महाराजांना पाठिंबा दर्शवला आहे.

नुकताच महाराष्ट्र केसरी झालेला पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी स्वतः इंदोरीकर महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे.

महाराजांच्या पाठीमागे सर्व पैलवान ठाम आहेत. प्रसंगी आम्ही सर्व पैलवान महाराज्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर सुद्धा उतरू व न्यायाची मागणी करू, असं हर्षवर्धन सदगीर यांनी म्हटलं आहे.

आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन घडवणारे आणि आपल्या विनोदी शैलीतुन जनसामान्यांना अध्यात्माची गोडी लावणारे श्रीनिवृत्तीबुवा इंदोरीकर महाराज यांच्यावर हल्ली जी चिखलफेक विविध माध्यमातून सुरू आहे त्याला विरोध आणि निषेध म्हणून तसेच इंदोरीकर महाराजांच्या महान कार्याला पाठिंबा म्हणून नाशिकच्या पैलवानांनी इंदोरीकर महाराजांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-इंदोरीकरांविरोधात गेल्या तर तोंड काळं करू; करणी सेनेचा तृप्ती देसाई यांना इशारा

गुंडांचं आत्मबल वाढवणारं ‘पालकत्व’ बीडला मिळालं हे आमचं दुर्दैव; पंकजांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

-एकेकाळी बसस्टॉपवर रात्र काढणाऱ्या निलेश साबळेने मुंबईत घेतलं स्वत:चं घर!

-ठाकरे सरकार फार दिवस टिकणार नाही- नारायण राणे

-इंदुरीकरांच्या वक्तव्यावरून होत असलेल्या वादात आता शिवप्रतिष्ठानची उडी!