Loading...
महाराष्ट्र मुंबई

झेंडा आणि अजेंडा बदलताच राज ठाकरेंचा जुना सहकारी पक्षात परत!

मुंबई |  राज ठाकरे यांनी 2006 साली मराठी अस्मितेच्या मुद्यावर मनसेची स्थापना केली. आपल्या पहिल्याच निवडणुकीत म्हणजेच 2009 च्या निवडणुकीत मनसेचे एकाच फटक्यात 13 आमदार निवडून आले. मात्र आता बदललेल्या परिस्थितीत मनसेची अवस्था काहीशी बिकट झाल्यानंतर मनसेने आपले इरादे बदलले, झेंडा बदलला आणि अजेंडा देखील बदलला…. राज यांनी इरादा बदलताच त्यांचे पूर्वीचे सहकारी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज मनसेत प्रवेश केला. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी मनसेत प्रवेश केला.

हर्षवर्धन जाधव यांनी गेल्या 1 महिन्यांपूर्वीच राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मनसेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव आणि राज ठाकरेंची भेट ही महत्वाची मानली जात होती. याच भेटीत घरवापसीची चर्चा झाली होती.

Loading...

हर्षवर्धन जाधव यांच्याबरोबर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी देखील मनसेत प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून या पुढील काळात काम करणार असल्याच्या भावना प्रकाश महाजन आणि हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, उद्या मनसेची बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत मोर्चा होत आहे. या मोर्चाची जय्यत तयारी मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-मिसळ प्रेमींना दिलं नितेश राणेंनी हटक्या अंदाजात निमंत्रण

-शरद पवारांनी तरुणाला विमानातून दाखवला चाकण अन् मगरपट्टा; मराठवाड्याच्या तरूणाला झालं आभाळ ठेंगणं

-… म्हणून संभाजी भिडेंना अटक होण्याची शक्यता

-“अंगाऱ्या धुपाऱ्याने मंत्री झालेल्या पाटलांचं पद दोन चार महिन्यात जाणार”

Loading...