“आता चंद्रकांत खैरे खासदार होणे नाही…!”

मुंबई |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या राजकारणाची दिशा बदलून हिंदुत्वाची शाल पांघरण्याचं ठरवताच पक्षातले जुने सहकारी आता पक्षात परतताना दिसत आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज मनसेत प्रवेश केला. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांच्या उपस्थित मनसेचा नवा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला. यावेळी माझ्या मनसे प्रवेशाने आता औरंगाबादचं राजकारण बदलेल आणि इथून पुढे चंद्रकांत खैरे खासदार होणार नाहीत, अशी भविष्यवाणी जाधव यांनी वर्तवली.

मी औरंगाबाद लोकसभा लढवली त्यावेळी जनतेने माझ्या पारड्यात 3 लाख मतं टाकली. महाराष्ट्रात कोणत्याही अपक्ष उमेदवाराला एवढी मतं मिळाली नाहीत. त्यामुळे मी हवेत गोळ्या झाडत नाहीत. येणाऱ्या काळात मी माझी ताकद दाखवून देईल, असं म्हणत त्यांनी चंद्रकांत खैरे यांना इशारा देखील दिला.

हर्षवर्धन जाधव यांनी गेल्या 1 महिन्यांपूर्वीच राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मनसेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव आणि राज ठाकरेंची भेट ही महत्वाची मानली जात होती. याच भेटीत घरवापसीची चर्चा झाली होती. हर्षवर्धन जाधव यांच्याबरोबर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी देखील मनसेत प्रवेश केला आहे.

मधल्या काळात जरासं भटकल्यासारखं झालं होतं. काही गैरसमज झाले होते आणि ते गैरसमज आता दूर झाले आहेत. त्यामुळे घरवापसीचा आनंद होत आहे, अशी भावना पक्षात परतल्यावर जाधव यांनी व्यक्त केली.

राज ठाकरेंचं हिंदुत्व बेगडी हिंदुत्व नाहीये. छत्रपतींचं हिंदुत्व राज ठाकरेंनी स्विकारलंय. शिवसेना हिंदुत्वापासून दूर जातीये. शिवसैनिक यामुळे नाराज आहेत. त्यामुळे नाराज लोक मनसेत प्रवेश करतील. तसंच नव्या भूमिकेत हर्षवर्धन जाधव डॅशिंग दिसेल, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीचा गड आम्हीच जिंकणार; भाजपच्या मनोज तिवारींचा दावा!

-साहेब, हेल्मेट तुटलंय, पैसे संपलेत मला पकडू नका; पुणे पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर

-झेंडा आणि अजेंडा बदलताच राज ठाकरेंचा जुना भिडू पक्षात परत!

-52 वर्ष, सलग 14 वेळा तुम्ही मला निवडून दिलं…; आळंदीच्या कार्यक्रमात शरद पवार भावूक

-मिसळ प्रेमींना दिलं नितेश राणेंनी हटक्या अंदाजात निमंत्रण