देवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्य सरकारच्या कामावरून आरोप केले जात आहेत. सरकारकडूनही फडणवीस यांना उत्तर दिली जात आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

फडणवीस साहेब, थोडं शांत बसा आणि सरकारचं काम बघत रहा, असा टोला हसन मुश्रीफ यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. त्यांना ‘मौनंम सर्वार्त साधनम्’, ‘मौनव्रताने मनाची शांती लाभते’ आणि ‘प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय,’ अशी तीन पुस्तके भेट देणार आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत असलेल्या आरोपांवरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात आज 186 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, वाचा किती नवे रूग्ण मिळाले…

-‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी

-पंढरीच्या वारीबद्दल मोठा निर्णय; अजित पवारांनी घेतली ‘ही’ ठाम भूमिका!

-राज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकलं; मुख्यमंत्र्यांची आदरांजली

-‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी