नवी दिल्ली | मागील दोन वर्षापासून देशातील जनतेला महागाईची झळ बसत असल्याचं पहायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेल, सिलेंडर आणि भाजीपाल्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
कोरोना काळाआधी देशातील अनेक उद्योगधंदे डबघाईला आले होते. त्यानंतर कोरोनाने त्यात आणखी भर घालत मोठमोठे उद्योग देखील बंद होण्याचे मार्गावर आहे. अनेक कंपन्यांनी यावेळी मत्तेदारी निर्माण केली.
त्यामुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील अंतर वाढत गेल्याचं मागील अहवालातून स्पष्ट झालं होतं. अशातच आता देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
भारतात महागाईचा दर खूप जास्त नाही, अशी प्रतिक्रिया सीतारामन यांनी दिली आहे. अमेरिकेतील वाॅशिग्टन डीसी येथील एका कार्यक्रमात बोलताना सीतारामन यांनी हे वक्तव्य केलं आहे.
भारतासमोर आंतरराष्ट्रीय आव्हान असल्याचं सीतारामन यांनी यावेळी सांगितलं आहे. सीतारामन यांच्या या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.
देशांतर्गत उत्पादित किमतीतील वाढीतून घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर मार्चमध्ये 14.55 टक्के नोंदविला गेला होता. त्यामुळे सामान्यांपासून व्यवसायिक देखील महागाईमुळे त्रस्त आहेत.
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खासदाराने सभागृहात कुर्ता वर करून केलं असं काही की…; व्हिडीओ तुफान व्हायरल
Devon Conway च्या प्री-वेडिंग पार्टीत चेन्नईच्या खेळाडूंचा लुंगी डान्स; पाहा व्हिडीओ
कीर्तनकार सेक्स व्हिडीओ प्रकरणात अखेर पोलिसांची मोठी कारवाई!
IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! सामना सुरू होण्याआधीच वाईट बातमी आली
राज्यात पुन्हा निर्बंध लागणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य