नागपूर महाराष्ट्र

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची 7 दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी

वर्धा | वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापीकेवर पेट्रोल टाकून मारण्याची धक्कादायक घटना घडली होती. अखेर या प्रकरणातील तरुणीने आपला प्राण सोडला आहे. सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी सुरु असणारी झुंज अपयशी ठरली आहे. ऑरेंजसिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली.

आज सकाळी 6.55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. हिंगणघाट येथील मेडिलक बुलेटीनमध्ये डाॅक्टरांनी याबाबतची माहिती दिली आहे. सकाळी दोनच्या सुमाराच पीडितेला ह्रद्यविकाराचा झटका आला होता, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली आहे.

सात फेब्रुवारीला पीडितेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तेव्हापासून तिची प्रकृती चिंताजनक होती. तिचा रक्तदाबही अनेकदा वाढत होता. तसेच तिला इंफेक्शनही झालं होतं. पीडितेला वाचवण्यासाठी डाॅक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. पण त्यांच्या प्रयत्नाला यथ आले नाही.

दरम्यान, पीडितेच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“राजकारण व्यवसाय समजला की भूमिका, झेंडे आणि भाषा बदलतेच!”

-काॅंग्रेसच्या महिला खासदाराचा ‘हा’ व्हीडिओ तुफान व्हायरल

-“केंद्र सरकार चांगलं काम करतं त्यावेळी मी भाजपचं कौतुक केलं आणि काही चुकीचं दिसलं त्यावेळी सरकारवर टीकाही केली”

-“केंद्र सरकारला सांगतोय, पोलिसांना फक्त 48 तास द्या, मग बघा…”

-माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय?; असं म्हणत राज ठाकरेंनी दिलं सीएएला समर्थन