Loading...
नागपूर महाराष्ट्र

त्याला फक्त 10 मिनिटे आमच्याकडे द्या…. जिवंतच जाळून टाकतो- पीडितेचा मामा

वर्धा | वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून मारण्याची धक्कादायक घटना घडली होती. अखेर त्या तरुणीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र सुन्न झाला असून आरोपीला फक्त 10 मिनीट आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी पीडितेच्या मामाने केली आहे.

आमच्या मुलीला मारणाऱ्या त्या नराधमाला फक्त 10 मिनीटं आमच्या ताब्यात द्या. त्याला आम्ही जिंवत जाळू. आमच्या मुलीला जितका त्रास झाला आहे तितकाच त्रास त्याला व्हायला पाहिजे, असं पीडितेचे मामा म्हणाले आहेत. ते माध्यमांना प्रतिक्रिया देत होते.

Loading...

आरोपीला तात्काळ शिक्षा होईल असं लेखी आश्वासन द्या, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. तसेच पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी देण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

दरम्यान, जो त्रास माझ्या मुलीला झाला तो त्रास आरोपीला झाला पाहिेजे. आरोपीला आमच्या स्वाधीन करा. माझ्यासमोर त्याला जिवंत जाला, अशी प्रतिक्रिया मुलीच्या वडिलांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मी हिरोपेक्षा काही कमी नाही- अशोक चव्हाण

-“आज ती जळाली नाही समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला; हिंगणघाटच्या निर्भयाचा आज वेदनादायी अंत झाला”

-पुण्यात अ‌ॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

-महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला; माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय- यशोमती ठाकूर

-राज साहेब, तुम्ही हिंसा करण्याची भाषा करत असाल तर…- नवाब मलिक

Loading...