महाराष्ट्र मुंबई

महिला अत्याचाराची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; राबवणार ‘आंध्र पॅटर्न’!!

मुंबई |  गेल्या काही दिवसांपासून महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे महाराष्ट्र हादरुन गेला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे.

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दिशा कायदा लागू करणार असल्याची घोषणा अनिल देशमुख यांनी केली आहे. बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने आरोपींना 21 दिवसात फाशी देण्याचा कायदा आणला होता. आता महाराष्ट्रातही तो आणला जाणार आहे.

या प्रकरणी 13 जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे. या न्यायालयांमध्ये बलात्कार, लैंगिक छळ, महिला व मुलींवर होणारे अत्याचार यावरील खटले चालवले जाणार आहेत.

दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि औरंगाबादमधील जळीतकांडामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. दोषींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांचा निर्णय महत्वाचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही ‘दिशा’ कायदा आणणार; अनिल देशमुखांची घोषणा

-CAA आणि NPR च्या विरोधामागे मतांचं राजकारण; मोदींचा आरोप

-पाकमध्ये हिंदूवर होणाऱ्या हल्ल्याचा अमेरिकेने नोंदवला निषेध

-तिसरीत शिकणाऱ्या श्रेयाचं अक्षर पाहून जयंत पाटील भारावले; केलं तोंडभरून कौतुक

-भाजप वैचारिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर… त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळले नाहीत- जयंत पाटील