अर्णव गोस्वामींना पुन्हा अ.टक होणार? गृहमंत्री म्हणाले…

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी अर्णव गोस्वामी आणि बा.र्कचे अधिकारी पार्थे दासगुप्ता यांच्यातील व्हाॅट्सअप चॅट ली.क झालं होतं. या व्हाॅट्सअप चॅटमधून अनेक ध.क्कादायक बाबी उघड झाल्या होत्या.

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथील सी.आर.पीएफ. जवानांवर ह.ल्ला झाला होता. सी.आर.पीएफ जवा.नांवर झालेल्या या ह.ल्ल्यानंतर पाकि.स्तानातील बालाकोटवर भारतीय दलाने हवाई ह.ल्ला केला होता. मात्र, भारताने हा ह.ल्ला करण्यापूर्वीच तीन दिवस अगोदर या घटनेची माहिती अर्णव गोस्वामी यांना होती.

भारतीय सै.न्याच्या या अत्यंत गोप.नीय आणि संवे.दनशील टा.स्कविषयी माहिती अर्णव गोस्वामींकडे तीन दिवस अगोदरच कशी आली, असा सवाल सध्या सर्वच स्तरातून विचारला जात आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर महाविकास आघाडीतील काही नेते देखील अर्णव गोस्वमिंच्या वि.रोधात आ.क्रमक झाले आहेत.

हा सर्व देशद्रो.हाचा प्रकार असून अर्णव गोस्वामी यांना तत्काळ अट.क करावी, अशी मागणी कॉंग्रेस नेत्यांनी मंगळवारी केली आहे. प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मंगळवारी याप्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली.

अर्णव गोस्वामी यांच्यावर तात्काळ का.रवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी सचिन सावंत यांनी अनिल देशमुख यांच्याकडे केली. अनिल देशमुख यांनी देखील सचिन सावंत यांच्या मागणीवर सहमती दर्शवली.

अर्णव गोस्वामी यांच्या या प्रकरणावर अधि.काऱ्यांशी चर्चा केली जाईल. अधिकाऱ्यांकडून का.यदेशीर सल्ला घेवून पुढे योग्य ती कार.वाई केली जाईल, असं यावेळी अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या ली.क झालेल्या व्हाॅट्सअप चॅटनंतर आता या दोघांवर कार.वाई होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-