“आत्ताच्या परिस्थितीत घरी राहणं हेच देशासाठी मोठं योगदान”

मुंबई | कोरोना विषाणूविरोधातला लढा हा अधिकच तीव्र झाला आहे. महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागू केली आहे. सरकारने हा निर्णय घ्यावा, याची अनेक जण वाट पाहत होते. अभिनेता हेमंत ढोमे याने सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आताच्या परिस्थितीत घरी राहणं हेच देशासाठी मोठं योगदान त्याने म्हटलं आहे.

महाराष्ट्र शासनाचा संचारबंदीचा आदेश आपल्या सगळ्यांसाठी बंधनकारक आहे. या कठीणरविवारी  प्रसंगी आपण आपल्या घरी थांबणं हेच देशाचा नागरिक म्हणून आपल्या देशासाठी सर्वांत मोठं योगदान आहे, अशा भआवना त्याने व्यक्त केल्या आहेत. त्याने याबाबत ट्विटकरून जनतेने देखील सरकारच्या आदेशाचं पालन करावं यासाठी जनजागृती केली आहे.

दुसरीकडे रविवारी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला भारतभरातून प्रचंड मोठा प्रसिसाद दिल्यानंतर आज मात्र लोकांची शिस्त आणि कायदा मोडून विनाकारण घराबाहेर पडल्याचं चित्र होतं. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही जनता त्यांचं आवाहन मनावर घेत नव्हती. यामुळे शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसंच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. मात्र ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-जिथून कोरोनाची सुरुवात झाली तिथून आली आनंदाची बातमी

“मला पोलीस सुरक्षा नको, आत्ताच्या घडीला महाराष्ट्राला त्यांची जास्त गरज आहे”

-कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावं म्हणून शरद पवारांनी दिला हा संदेश

-“सरकार गंभीर होगी तो जनता गंभीर होगी”

-“पाकिस्तानमध्ये आम्ही लॉकडाउन करु शकत नाही”