“…तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल”

मुंबई | देशामधील कोरोनाग्रस्तांची संख्या 503 वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या 101 वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतासारख्या 130 कोटींची लोकसंख्या असणाऱ्या देशात सोशल डिस्टन्सींगमुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळू शकते असं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटलं आहे.

नागरिकांनी घरीच थांबून सोशल डिस्टन्सींगची अंमलबजावणी काटेकोरपणे केली तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल, असं आयसीएमआरने सांंगितल आहे.

दरम्यान, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. मात्र नागरिकांनी या सगळ्या काळात घरी राहून, स्वयंशिस्त पाळून आम्हाला सहकार्य करा, असंही आवाहन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-शहरातून गावाकडे पळणाऱ्यांना संजय राऊत यांचा सोप्या शब्दात खास सल्ला!

-‘कोरोना रोखण्यासाठी भारताने घेतलेले निर्णय योग्यच’; WHO कडून भारताचं कौतुक

-26 मार्चला होणारी राज्यसभेची निवडणूक आयोगाने पुढे ढकलली

-पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता पुन्हा संबोधित करणार; काय घोषणा करणार??

-कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलं तीन महिन्यांचं वेतन