Uncategorized महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रकातून समोर आली माहीती

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेसाठी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेसह त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली आहे. शरद पवार यांच्याकडे 29 हजार 570 रूपये तर पत्नी प्रतिभांकडे 25 हजार 750 तसेच एकत्र कुटुंब म्हणून दहा हजार 360 रूपयांची रोकड आहे.

शरद पवार यांच्या नावे चार कोटी 28 लाख 78 हजार 520 रूपयांची स्थावर मालमत्ता तर आठ कोटी 10 लाख 86 हजार 688 रूपयांची जंगम मालमत्ता आहे. तर पत्नी प्रतिभा यांच्या नावे तीन कोटी 23 लाख 55 हजार 421 रूपयांची स्थावर तर 13 कोटी 47 लाख 54 हजार 299 रूपयांची जंगम मालमत्ता आहे. विशेष म्हणजे पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावावर एकही गाडी नाही.

विविध बॅंकांत त्यांच्या नावावर तीन कोटी 37 लाख 14 हजार 851 रूपये तर पत्नी प्रतिभा यांच्यानावे बॅंकेत दोन कोटी 58 लाख 89 हजार 280 रूपये तर हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून तीन कोटी 43 लाख 89 हजार 258 रूपये त्यांच्या खात्यावर आहेत. पवार यांच्या नावावर महाराष्ट्र बॅंक पुणे शाखेत एक लाख पाच हजार 167 रूपये मुंबई बरोडा बॅंकेत पाच लाख 92 हजार 058 रूपये, स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नवीन दिल्ली शाखेत 13 लाख 56 हजार 620 रूपये, पीडीसीसी बॅंक भवानीनगर येथे 12 हजार 518 रूपये आहे. तसेच तीन कोटी 16 लाख 48 हजार 486 रूपयांचे फिक्‍स डिपॉझिट आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्याकडे 38 लाख 17 हजार 422 रूपयांचे 848.07 ग्रॅम सोने असून सहा लाख 70 हजार 179 रूपयांचे 15 हजार 171 ग्रॅम चांदीचे दागिने आहेत. एकुण 44 लाख 87 हजार 601 रूपयांचे दागिने आहेत. तर पत्नी प्रतिभा यांच्याकडे 19 लाख 59 हजार 970 रूपयांच्रे 414.528 ग्रॅम सोने, सात लाख 54 हजार 111 रूपयांचे 17 हजार 071 ग्रॅम चांदी असे एकुण 27 लाख 14 हजार 081 रूपयांचे दागिने आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

“कोरोनो गो…. नंतर आता ‘महाविकास आघाडी गो’, असं म्हणावं लागेल,”

“सरकारला वशिलेबाजीला प्रोत्साहन द्यायचं आहे का?”

-जुन्या खोंडांना नकार; शिवसेनेची पहिली पसंती प्रियांका चतुर्वेदी!

-विधानसभेनंतर राज्यसभेचंही तिकीट नाही; त्यावर नाथाभाऊ म्हणतात…

-ज्यांच्या नावाची चर्चा त्यांचा पत्ता कट… भाजपने दिली तिसऱ्यालाच उमेदवारी