Top news

लडाखमध्ये तुमचा हस्तक्षेप नको, आमचं आम्ही बघू; चीनचं अमेरिकला उत्तर

वुहान | लडाखमध्ये सुरु असलेल्या भारत-चीन सीमावादात तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नाही असं चीनने म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर 25 मिनिटे चर्चा झाली. त्यात लडाखमध्ये सुरु असलेल्या सीमा वादावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर आज चीनने तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

मागच्या आठवडयात डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करुन अमेरिका भारत-चीन सीमावादात मध्यस्थी करायला तयार असल्याचे म्हटले होते.

ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. लडाखमध्ये भारत-चीनमध्ये सुरु असलेला सीमावाद, कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेले संकट आणि जागतिक आरोग्य संघटनेत सुधारणा या मुद्दांवर दोन्ही नेत्यांमध्ये बोलणं झाल्याचं कळतंय.

भारत आणि चीन दोन्ही देशांकडे सीमावाद सोडवण्यासाठी यंत्रणा आहे. चर्चा आणि वाटाघाटीच्या माध्यमातून वाद सोडवण्याची आमची क्षमता आहे. तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पंधरा दिवसांत एक लाखावरून दोन लाखांवर

-कोरोना संपल्यानंतर मी राज्यभर दौरा करणार- पंकजा मुंडे

-देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा समावेश

-“आभाळ जरी कोसळलं तरी…, महाराष्ट्रा काळजी घे”

-चक्रीवादळाचं केंद्र मुंबई राहिलं नाही, तरीही पुढील 2-3 तास महत्त्वाचे- बाळासाहेब थोरात