“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊतांनी आज वादळी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. त्यावेळी त्यांनी सोमय्यांना अटक करण्याची मागणी देखील केली आहे.

किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतल्याचं देखील राऊतांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत. ईडीच्या कार्यालयात जाऊन सोमय्या भडवा रोज दही-खिचडी खातो असंही राऊत म्हणाले आहेत. याच्या बापाचं राज्य आहे का इथं, असंही राऊत म्हणाले आहेत.

पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा पुन्हा उल्लेख केला जात होता. त्यातला मुख्य आरोपी राकेश वाधवानशी आमचे संबंध असल्याचं सांगितलं आहे.

राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात वीस कोटी गेल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या – 

“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा

“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”

‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ

निवडणुकीआधी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; तब्बल 46 वर्षांनंतर ‘हात’ सोडला

मुंबईत ईडीची मोठी कारवाई! कुख्यात गुंड दाऊदच्या संबंधितांवर छापेमारी