माझ्या आमदारकीचा पगार मी सामाजिक गोष्टींसाठी वापरेल- रोहित पवार

पुणे |  कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज ट्वीटरवरून तरूण तरूणींशी संवाद साधला. यावेळी तरूणांनी अनेक मुद्द्यांवर रोहित पवार यांना बोलतं केलं. तुमचं आवडतं गाणं कोणतं? इथपासून ते त्यांच्या हेलिकॉप्टरच्या स्वप्नापर्यंत…! रोहित पवार यांनीही तरूणांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तर दिली. या ट्वीटर गप्पांमध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक या सगळ्या गोष्टींवर रोहित यांना तरूणांनी बोलत केलं. असाच एक सामाजिक प्रश्न एका तरूणाने उपस्थित केला अन् रोहित पवार यांनीही अतिशय संवेदनशील आणि आदर्श उत्तर दिलं…!

आजी माजी आमदार यांच्या पगार आणि पेंशन या खर्चाबाबत एक तरूण आमदार म्हणून तुमची भूमिका काय असेल? हा पैसा शेतीसाठी व इतर विकास कामांसाठी उपयुक्त ठरू शकतो याबद्दल तुमची भूमिका? काय असा प्रश्न नरेंद्र पवार नावाच्या तरूणाने विचारला. यावर व्यक्तीशः माझा पगार मी सामाजिक गोष्टींसाठी वापरेल याची ग्वाही देतो, असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं.

दुसरीकडे फक्त नोकरच नाही तर उद्योजक पण घडावेत यासाठी आपले काय प्रयत्न असतील? , असा प्रश्न एका तरूणाने विचारल्यावर शाळेपासून तर कॉलेज पर्यंत याबाबतीतील चर्चा करावी लागेल. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं.

स्वत:च्या पैशातून हेलिकॉप्टर घ्यायचं माझं स्वप्न असल्याचं रोहित यांनी बोलून दाखवलं होतं. त्यांच्या या स्वप्नावर देखील एका तरूणाने त्यांना प्रश्न विचारला होता. यावर पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला मी दिलेलं उत्तरं होतं. ते तुम्ही शब्दशः घेऊ नका. आपल्याला सर्वांसाठी मला काम करायचं आहे, असं रोहित म्हणाले.

रोहित पवार यांनी तरूणाच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं ट्वीट-

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-रोहित पवारांच्या हेलिकॉप्टरच्या स्वप्नावर तरूणाचा थेट त्यांनाच प्रश्न!

-महामोर्चाआधी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा

-नरेंद्र मोदी पाठीवर दंडे खातील पण तरूणांना रोजगार देणार नाहीत- नितीन राऊत

-महाराष्ट्राला झालंय तरी काय?? अभिनेत्री मानसी नाईकची तरूणांकडून छेडछाड

-….म्हणून रोहित पवारांना तरूणाने मागितली आत्महत्या करण्याची परवानगी!