महाराष्ट्र नागपूर

तुकाराम मुंढेंनी शासनाचा आदेशही मानला नाही; दारुची दुकानं बंद म्हणजे बंदच!

tukaram mundhe

नागपूर |  कोरोनामुळे राज्यात गेली दीड महिना सगळी दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यामध्ये सरकारचा खूप सारा महसूल बुडत होता. याचमुळे अर्थव्यव्यवस्थेला देखील मोठा फटका बसला होता. याच पार्श्वभूमीवर दारूची दुकाने सुरू करून घसरलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रूळावर आणण्याचे प्रयत्न शासनाने केले आहेत. मात्र शासनाचा हा निर्णय नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ऐकला नाही.

देशात सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्याट प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात दारू विक्रिला मुभा देण्यात आली आहे. मात्र तुकाराम मुंढेनी एक वेगळा आदेश काढून आम्ही शिथीलता देणार नसल्याचं स्पष्ट केलं.

तुकाराम मुंढेंनी काढलेल्या नव्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. नागपूरमधील वकील मनोज साबळे, प्रकाश जैसवाल, किशोर लांबट, कमल सतुजा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांचा निर्णयाला याचिकाकर्त्यांनी विरोध केला असून केंद्र, राज्य शासन आणि मनपाच्या आदेशआत विरोधाभास असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-परप्रांतीय मजुरांची पोलिसांवर दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर

-…या दोन मराठमोळ्या मुलींनी आपल्या अदाकारीनं जिंकलं साऱ्या महाराष्ट्राचं मन

-उठवलेली दारूबंदी हे शासनाचं अतर्क्य पाऊल- डॉ. अभय बंग

-लॉकडाउनच्या नियमांचा भंग केल्याने उत्तर प्रदेश पोलिसांकडून अजब शिक्षा, म्हणाले…

-“व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा सगळ्यांना घेऊन बुडणार एक दिवस”