Loading...
पुणे महाराष्ट्र

आता आपली कपॅसिटी संपली… किर्तन सोडून शेती करतो- इंदुरीकर महाराज

अहमदनगर | सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज चांगलेचं अडचणीत सापडले आहेत. या सर्व परिस्थितीवर काल रात्री एका किर्तनात इंदुरीकरांनी भाष्य केलं आहे.

मी कशात सापडत नाही म्हणून मला अडकवण्याचा प्रयत्न सुरुय. मी तर आता या मुद्द्यावर आलो आहे की, 1-2दिवस जाऊ द्यायचा, आता लय झालं, फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कपॅसिटी संपली, असं म्हणत इंदुरीकरांनी या वादाला वैतागल्याचं सांगितलं आहे.

Loading...

2 तासांच्या भाषणात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. पण मी जे बोललो ते चुकीचं नाहीच. मी बोललो ते अनेक ग्रंथांमध्ये नमूद केलेलं आहे. यूट्यूबवाले काड्या करतात. यूट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु सांगतो चॅनल संपतील पण मी नाही, असं इंदुरीकर म्हणाले आहेत.

दरम्यान, मी म्हणतोय हे खरंय. तरी लोकं म्हणतायेत याला ठेऊन द्या पहिलं. आणि चारी बाजूला… तीन दिवसात अर्धा किलोने कमी झालो हो या वादाने मला त्रास होतोय. एक दोन दिवस बघेन अन् किर्तन सोडून शेती करेन, असं म्हणत त्यांनी या सगळ्या वादाला कंटाळले असल्याचं म्हंटलंय.

महत्वाच्या बातम्या-

-सत्तेसाठी भुकेल्या शरद पवार यांनी उसनं अवसान आणू नये; भाजप नेत्याची खरमरीत टीका

-शांततेच्या मार्गानं सीएए कायद्याला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरत नाही- हाय कोर्ट

-भाजपकडून सातारचे उदयनराजे भोसले जाणार राज्यसभेवर!

-महाविकास आघाडीचा विद्यार्थ्यांना दिलासा; महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय!

-अमृता फडणवीसांचं नवं इंग्रजी गाणं सोशल मीडियावर ट्रोल!

Loading...