Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘मला दंगल भडकवायची असती तर…’; राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

1 raj e1648911447910
Photo courtesy - facebook /MNS Adhikrut

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.  मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर दुप्पट आवाजामध्ये हनुमान चालीसा लावू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

आम्ही उपस्थित केलेला मुद्दा हा सामाजिक आहे. दंगल जर भडकवायची असती तर संभाजीनगरमधील सभेत भडकवली असती, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

शांतता बिघडावी, अशी आमची अजिबात इच्छा नाही. जर या प्रकरणाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही धार्मिक वळण देऊ, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

संभाजीनगरमध्ये माझं भाषण सुरू असताना यांनी बांग दिली. त्यावेळी मी पोलिसांना सांगितलं. जर भडकवायचं असतं तर तिथे काय झालं असत?, असा प्रश्न राज ठाकरेंनी केला.

मशिदींवरील भोंग्यांचं डेसिबल मोजलं जात नाही. डेसिबलचं उल्लंघन होत आहे. एकदा निकाल दिल्यानंतर सरकार जर काही करत नसेल काय फायदा न्यायालयाचा?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

आम्हाला परवानगी देताना एका दिवसाची 10 ते 12 दिवसांची लाऊडस्पीकरची परवानगी दिली जाते. त्यांना 365 दिवसांची परवानगी कशाला?, अशा प्रश्नांची सरबत्ती राज ठाकरेंनी केली आहे.

महाराष्ट्र सैनिक आणि हिंदू बांधवांना एवढचं सांगायचं आहे की, हा विषय एका दिवसाचा नाही. 4 तारीख दिली म्हणून फक्त 4 तारखेला आंदोलन सुरू राहणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, सर्वसाधारणपणे आता अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना सैनिकांना नोटीसा पाठवण्यात येत आहेत, त्यांना ताब्यात घेत आहेत. ही गोष्ट फक्त आमच्याबाबत का होते ?, असा प्रश्न आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

“1857 च्या युद्धात तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी लढलो असेल”

अडीच वर्षे तुम्ही काय केलं? पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

“भोंगेंबाज राजकारण्यांनी आज हिंदूत्त्वाचा सुद्धा गळा घोटला”

मोठी बातमी! ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला दणका

 जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत….- राज ठाकरे