“गुवाहाटी आणि सुरतला तुम्ही काय काय चाळे केले, हे भविष्यात…” अमोल मिटकरींचा पलटवार

मुंबई | आजचा विधीमंडळाचा पावसाळी अधिवेशनाचा दिवस विधीमंडळाबाहेरील मारामारीने गाजला. विधानसभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा वाद सुरु आहे, तर सकाळी विधानसभेच्या बाहेर दोनही गटाच्या आमदारांत मारामारी झाली.

सत्ताधारी पक्षांचे आमदारांनी, गेले दोन दिवस विरोधी पक्ष देत असलेल्या गद्दार आणि पन्नास खोके या घोषणावर आज आक्षेप नोंदवत असताना, अचानक दोनही गटात शाब्दिक वाद झाला. त्याचे रुपांतर अंगावर धाऊन जाण्यात झाले आणि प्रकरण चिघळले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mikari) आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांच्यात धक्काबुक्की झाली. यानंतर शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मिटकरी यांच्यावर टीका केली.

अमोल मिटकरी हे प्रसिद्धीझोतात येण्यासाठी माकडचाळे करत आहेत, असे वक्तव्य प्रताप सरनाईक (Prtap Sarnaik) म्हणाले. त्यावर अमोल मिटकरी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

सुरत (Surat) आणि गुवाहाटीला (Guwahati) तुम्ही काय काय चाळे केेले, हे मी भविष्यात लवकरत सांगणार आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले. ते प्रसार माध्यमांसोबत बोलत होते.

तसेच सरनाईक माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यामुळे मी माकडचाळे करतो, असे जर ते म्हणत असतील तर हरकत नाही. पण अमोल मिटकरी घाबरणारा नाही, कोणाच्या दहशतीला घाबरुन पळून जाणारा पळपुटा नाही, मी राष्ट्रवादी पक्षाचा आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख पळून गेले नाहीत. ही शरद पवार यांची शिकवण आहे, असे मिटकरी म्हणाले.

तुम्ही मला माकडचाळे म्हणा, किंवा आणखी काही बोला. पण तुम्ही काय चाळे केले आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. गुवाहाटी आणि सुरतला तुम्ही काय काय चाळे केले, हे भविष्यात मी महाराष्ट्राला सांगणार आहे, असा मिटकरी यांनी पलटवार केला.

महत्वाच्या बातम्या – 

“सावरकरांचा अपमान करणाऱ्या बाईला केतकी चितळेसारखी अटक होणार का?” – अभिनेते शरद पोंक्षे

सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार?, अशोक गहलोत म्हणाले

“… नाहीतर मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनला आग लागेल.”, जितेंद्र आव्हाडांनी दिला गंभीर इशारा

“अरे हाड, वो क्या हमको धक्काबुक्की करेंगे, हमने उनको धक्काबुक्की किया!”

“आम्ही काही केलं की तो घोडेबाजार आणि तुम्ही काय केलं…” धनजंय मुंडे यांची विधानसभेत बॅटिंग