Loading...
Top news

जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या गोष्टी

मुंबई | जगभरात कोरोना संसर्गानं थैमान घातलं आहे. त्यामुळे जगभरात इतर कशाहीपेक्षा कोरोना संसर्गाच्या नियंत्रणावर अधिक लक्ष केंद्रित झालं आहे. अगदी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं आहे. मात्र जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच अनेक गोष्टी घडल्या आहेत.

युरोपातल्या अनेक दारु कंपन्यांनी आता दारुऐवजी सॅनिटायझर बनवणं सुरु केलंय, देशातल्या एकूण 17 हजारहून अधिक सिनेमागृहांपैकी 500 सिनेमागृहं सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली. मात्र खबरदारी म्हणून या सर्व सिनेमागृहांमध्ये एकही व्यक्ती फिरकलेला नाही.

Loading...

आजपर्यंतच्या इतिहासात भारतात पहिल्यांदाच लॉकडाऊन झालंय. जगात लॉकडाऊन हा शब्द पहिल्यांदा अमेरिकेतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रचलित झाला. त्या हल्ल्यावेळी लॉकडाऊन करणारा अमेरिका हाच जगातला पहिला देश होता.

23 मार्चपासून अनेक खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे होणार आहे. देशातंर्गत न्यायलयीन खटल्यांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आर्थिक वर्ष 31 मार्चऐवजी 31 जून केलं गेलंय. एरव्ही मार्च एन्ड हा शब्द सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र कोरोनाच्या सावटामुळे यंदा मार्च एन्डऐवजी जून एन्ड म्हणावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-आज रात्री 12 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन, घराबाहेर पडण्यास बंदी; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

-सोशल डिस्टसिंग ठेवणं हाच कोरोनाला रोखण्याचा अंतिम मार्ग- पंतप्रधान मोदी

-पुणेकरांनो पेट्रोल-डिझेल भरायला जात असाल तर जरा थांबा…! फक्त ‘यांनाच’ मिळणार पेट्रोल-डिझेल

-“मी काहीही बंद केलं आहे असं सांगायला नाही तर राज्यातील जनतेला धन्यवाद द्यायला आलोय”

-“सध्या जगभरात, देशात कोरोना विषाणूचं संकट उभं असताना गुढीपाडव्याची खरेदी करायला घराबाहेर पडू नका”

Loading...