Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“राज्यात जातीभेदाचं बीज शिवसेनेनं पेरलं, तुमच्यात एवढीच हिंम्मत असेल तर…”

uddhav thackrey e1603855016891

मुंबई | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या महाविकास आघाडीत सामील होण्याच्या वक्तव्यानं राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेनेवर विरोधक जहरी टीका करत आहेत.

जलील यांनी एमआयएम महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं. परिणामी वादाला सुरूवात झाली आहे.

महाविकास आघाडीसोबत राज्यात भाजपचा विरोध करण्यास आपण तयार असल्याचंही जलील म्हणाले आहेत. त्यानंतर भाजपकडून शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे.

भाजपकडून शिवेसेनेवर इसिस समर्थक, तालिबान समर्थक, दाऊद समर्थक अशी टीका होताना सध्या दिसत आहे. अशातच इम्तियाज जलील यांनी देखील टीका केली आहे.

जलील यांच्या महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी औरंगजेब समर्थकांसोबत युतीचा प्रश्नच येत नसल्याचं वक्तव्य केलं होतं.

राऊत यांच्या वक्तव्यानंतर आता जलील यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला औरंगजेबाच्या कबरीपुढं झुकणारे अब्दुल सत्तार चालतात मग एमआयएम का नाही, असा सवाल जलील यांनी विचारला आहे.

तुमच्यात एवढीच हिंमत असेल तर मुस्लीम मते नकोय म्हणून सांगा, असंही जलील म्हणाले आहेत. राज्यात जातीभेदाचं बीज शिवसेनेनं पेरलं आहे, अशी टीका जलील यांनी केली आहे.

दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानंतर राज्यात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी आपापली बाजू मांडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा ‘या’ योजनेत गुंतवणूक, मिळतील इतके लाख रूपये

 “पावसात शरद पवार भिजले आणि निमोनिया भाजपला झाला”

कोरोनाच्या चौथ्यालाटेबाबत डॉ. अविनाश भोंडवेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती 

“हिंमत असेल तर काढा दोन्ही कुबड्या आणि लढा स्वबळावर” 

“संजय राऊतांचं असं आहे की दिन में बोले जय श्री राम, रात को लेते…”