संकटाच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक तयार- मोहन भागवत

नागपूर | आज पाडव्याच्या मुहर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघ स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी कोरोनाचं जे भीषण संकट देशावर आलं आहे या संकटाच्या काळात संघ स्वयंसेवक मदतीसाठी तयार आहेत, असं ते म्हणाले.

शासनच्या आवश्यक मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तयार आहेत. देशातील नागरिकांच्या मदतीसाठी सर्व आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीनं स्वयंसेवकांनी सुरू केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

संपूर्ण समाजाद्वारे अनुशासनाचं पालन केलं पाहिजे. औषधं आणि अन्य आवश्यक सेवा सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. करोनाविरोधातील या युद्धातील प्रमुख बाब म्हणजे सोशल डिस्टंसिंग आहे. ही आपल्या समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, अशीही आठवण भागवत यांनी करून दिली.

दरम्यान, आपण सर्वांनी यावेळी नियमांचं कठोरपणे पालन केलं पाहिजे. शासनाने सांगितलेल्या नियमांचं आपण जर योग्य रितीने पालन केलं तर लवकरच आपण कोरोनावर मात करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या – 

-लॉकडाऊनच्या काळात कंडोमची मागणी वाढली; विक्रेतेही चक्रावले

-कोरोनाच्या भीषण संकटात सानिया मिर्झा गरिबांना करणार मदत

-हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, कोरोनाला हरवून गुढीपाडवा साजरा करु- उद्धव ठाकरे

-हा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करा आणि सर्व शंका विचारा; उद्धव ठाकरेंचं आवाहन

-पोलिसांनी तेल लावून लाठी वापरावी- अनिल देशमुख