महाराष्ट्र

अचानक आलेल्या नाल्याच्या पुरामध्ये चौघांचा मृत्यु, बैलगाडीसोबत आजोबा नातूही गेले वाहून

वर्धा- सध्या वादळी पावसाने काही शेतकरी सुखावले असले तरी काही शेकऱ्यांना मात्र पुरासारख्या परीस्थितीला सामोर जाव लागत आहे.  असेच एक शेतकरी कुटुंब शेतात काम करायला गेल ्सताना अचानक वादळी पावसाने हजेरी लावली आणि ते घरी येत असताना पावसाचा जोर वाढला तशातच घरी येत असतानाच. नाल्याला अचानक पुर आला आला आणि बैलगाडी वाहून गेली अशा दोन ठीकाणी वेगवेळ्या घटना घडल्या आहेत. त्या घटनांमध्ये एकून चौघांचा मृत्यु झाला आहे.

मृतांमध्ये दोन महिलांसह बारा वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. शुक्रवारी संध्याकाळी शेतीची कामं आटपून घरी जात असताना ही घटना घडली. काही पुरुष आणि महिला बैलबंडीच्या सहाय्याने रस्ता पार करत होते. अचानक बैलगाडी नाल्याच्या पुलावर फसल्याने दोन महिला पाण्याच्या प्रवाहात वाहू गेल्या. रात्री उशिरा दोघींचे मृतदेह सापडले. सोनेगाव स्टेशन येथील चंद्रकला लोटे आणि तळेगाव टालाटूले येथील बेबी भोयर अशी मृत महिलांची नाव आहेत.

तर दुसऱ्या ठीकानच्या घटनेत आजोबांसह बारा वर्षाच्या नातवाचाही समावेश आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. सोनेगाव येसंबा येथून येणाऱ्या नाल्यात गोजी येथे 12 वर्षीय मुलाचा आणि त्याचा आजोबाचा मृतदेह आढळून आला.

धोत्रा येथून सावली सासताबाद येथे जात असताना येरणगाव गोजी नाल्यात प्रवाह जास्त आल्याने आजोबा आणि नातू बैलगाडीसह वाहून गेले. नातू आणि आजोबा बैलगाडी देण्यासाठी जात असताना ही दु:खद घटना घडली.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोना असल्याच्या संशयाने तरुणीला फेकल बस बाहेर, तिथेच झाला मृत्यु

-धक्कादायक! तृथीयपंथीयांनी कापले तरुणाचे गुप्तांग