क्राईम महाराष्ट्र

नालासोपाऱ्यात गुंडांचा नंगानाच, दिवसाढवळ्या तरुणावर केले तलवारीचे वार

नालासोपरा- नालासोपाऱ्यात एक युवक आपल्या मित्राच भांडण सोडवायला गेला होता त्या मित्रावरच दिवसाढवळ्या तलवारीने वार केले आहेत. ही घटना 29 जूनला नालासापारा परीसरात घडली.

गुंडांच्या हल्ल्यात तो युवक खूप जखमी झाला असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. संजय मिश्रा (वय 22) असं जखमी युवकाच नाव आहे.

दरम्यान या घटनेबाबबत 30 जूनला 4 जणांविरोधात तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर इतर तीघांचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.डी. पाटील यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे नालासोपाऱ्यात हातात तलवारी घेऊन खुलेआम गुंडांचा नंगानाच सुरु असल्याचा हातात तलवार, लाठी-काठी घेतल्याचा एक व्हीडीओ सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे. कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे काढले जात आहेत.

 

-मुलाने जीव दिलेला बापाला नाही झाल सहन, स्वत:लाच लावून घेतला गळफास

-जुन्या रागाचा पारा चढला एवढा, मामीनेच बादलीत बुडवला चार वर्षाचा चिमुकला

-अचानक आलेल्या नाल्याच्या पुरामध्ये चौघांचा मृत्यु, बैलगाडीसोबत आजोबा नातूही गेले वाहून