Loading...
पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंच्या नावानं मागितली जातेय खंडणी! आमदार म्हणतात…

पुणे | पुण्यातल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाने पुण्यातल्या बड्या बांधकाम व्यावसायिकांना आणि ठेकेदारांना खंडणी मागितली जात आहे. फोन करून ही धमकी दिली जात आहे तसंच पैसेही उकळले जात आहेत.

आमदार टिंगरे यांनी विश्रांतवाडी पोलिस स्थानकात याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. माझ्या बदनामीचा यामधून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप टिंगरे यांनी केला आहे.

Loading...

सुप्रसिद्ध बांधकाम व्यवस्थापकाला 8070981333 या मोबाईल नंबरवरून फोन आला. ट्रुकॉलरवर त्यांनी तो नंबर चेक केला असता त्यांना एमएलए टिंगरे या नावाचा नंबर असल्याचं दाखवलं. त्यांनी फोन उचलला असता समोरून 50 हजार रूपये रोख कार्यलयात आणून द्या, अशी मागणी करण्यात आली.

तसंच पुण्यातल्या एका मोठ्या ठेकेदारालाही याच नंबरवरून शिलाई मशीनची मागणी करण्यात आली होती. आणि विशेष म्हणजे त्यांनी एका गाडीत 38 शिलाई मशीन आमदारांच्या कार्यालताच पाठवल्या देखील होत्या. आता या नंबरवरून खंडणी नेमकं कोण मागतंय? त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-ठाकरे सरकारचा फडणवीसांना धक्का; समित्यांवरच्या अशासकिय नियुक्त्या रद्द!

-दिल्लीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर भाजपचं एक पाऊल मागे; प्रादेशिक पक्षांना जवळ करणार

-शाळांमधून सावरकरांचे फोटो काढण्याचे राज्य सरकारचे आदेश; राजकीय वादाला फुटलं तोंड

-मनसैनिकांनो आमचं उष्ट कशाला खाताय?- गुलाबराव पाटील

-“सावरकरांनी देशाची अतूट सेवा केली अन् काँग्रेस त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करतंय”

Loading...