Loading...
Top news

बाहेरच्या लोकांनी गावात प्रवेश करु नये म्हणून गावकऱ्यांची नामी शक्कल

पारनेर | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने संपुर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर पोलीस प्रशासन काम करत आहेत.

ग्रामीण भागातही लोकं प्रवास करण्याचं टाळत नसून दुचाकीवर विनाकारण घराबाहेर पडत आहेत. यावर अटकाव आणण्यासाठी पारनेर तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये गावकरी कुणी प्रवाशी गावात येऊ नये म्हणून बाभळीचे फास रस्त्यावर टाकत आहेत.

Loading...

पारनेर तालुक्यातील बाबर मळा येथील ग्रामस्थांनी प्रथम पुढाकार घेऊन थेट रस्तेच बंद करण्याचे ठरवलेत. हे पाहून इतर गावांनीही पुढाकार घेऊन रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर काही कच्चे रस्ते जेसीबी च्या साहाय्याने खणून ठेवले जात आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, देशाचे पंतप्रधान वारंवार घराबाहेर पडू नका असा सल्ला देत आहेत. तरीही समाजातील काही लोक घराबाहेर पडत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

-देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन; सर्व रेल्वे गाड्याही 14 एप्रिलपर्यंत रद्द

-मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार सुरूच; मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांना पोलिसांनी पकडलं

-घरात बसून मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही तुमच्या गृहमंत्र्यांचं ऐका; उद्धव ठाकरेंचा मिश्किल अंदाज

-संकटाच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक तयार- मोहन भागवत

-लॉकडाऊनच्या काळात कंडोमची मागणी वाढली; विक्रेतेही चक्रावले

Loading...