देश

बायकोचे पाय दाबावे लागतात म्हणून ऑफिसला यायला उशीर; आयकर कर्मचाऱ्याचं अजब उत्तर

Income

बायकोचे पाय दाबावे लागतात म्हणून ऑफिसमध्ये यायला उशीर होतो, असं धक्कादायक कारण एका कर्मचाऱ्यानं दिलं आहे. उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथील ही घटना आता देशभरात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

चित्रकूटमधील आयकर विभागात काम करणारे लिपीक अशोक कुमार हे सतत उशीरा येत होते. त्यामुळे त्यांना यासंदर्भातील कारण विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण आता सोशल मीडियात चांगलंच व्हायरल होत आहे.

ऑफिसला येण्यापूर्वी मला बायकोचे पाय दाबावे लागतात. सकाळी उठल्यावर घरातील सर्व काम करावी लागते. जेवण तयार करून मुलांना शाळेत सोडावं लागतं. त्यामुळे मला ऑफिसला येण्यास उशीर होतो, असे स्पष्टीकरण अशोक कुमार यांनी दिलं आहे.

दरम्यान, त्यांचे हे स्पष्टीकरण पाहून आयुक्त निशब्द झाले होते. त्यामुळे पुन्हा असं होऊ नये, अशी ताकीद त्यांनी अशोक कुमार यांना दिली आहे.

pati office