Top news खेळ मुंबई

धोनीचं टेन्शन वाढलं! ‘हा’ हुकमी एक्का जखमी; पाहा व्हिडीओ

chennaii e1650538983357
Photo Credit - Twitter / @ChennaiIPL

मुंबई | क्रिकेटच्या मैदानावर आपल्या चपळाईनं सर्वांना अचंबीत करणारा खेळाडू म्हणून भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजाला ओळखलं जातं.

जडेजानं नुकतचं आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आरसीबी आणि चेन्नई दरम्यान महत्त्वाचा सामना खेळवण्यात आला.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं 173 धावांचा डोंगर उभा केला होता. यावेळी मैदानात क्षेत्ररक्षण करताना जडेजाला दुखापत झाली आहे.

मैदानात झेल पकडताना जडेजाला दुखापत झाली आहे. 17 व्या ओव्हरमध्ये अफलातून झेल पकडण्याच्या नादात जडेजा खाली पडल्यानं त्याला दुखापत झाली.

जडेजाच्या खांद्याला दुखापत झाल्यानं लागलीच संघाचे फिजीओ मैदानात धावत आले. त्यांनी काही काळ जडेजाला व्यायाम करण्यास सांगितलं होतं.

जडेजाच्या खांद्याला आणि डोक्याला हलक्या स्वरूपाचा मार लागला होता. परिणामी पुढील सामन्यात तो खेळू शकेल की नाही याबाबत अद्याप माहिती स्पष्ट करण्यात आली नाही.

रविंद्र जडेजा हा क्रिकेटच्या इतिहासातील महान क्षेत्ररक्षक गणला जातो. त्याच्यावर अनेक दिग्गजांची नजर असते. येणाऱ्या काळात भारतीय संघासाठी जडेजा महत्त्वाची कामगिरी करू शकतो.

पाहा व्हिडीओ – 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

 …म्हणून तुरुंगातून बाहेर येताच नवनीत राणा लिलावती रूग्णालयात दाखल

“राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही”; भाजप खासदार आक्रमक

 “काय अल्टिमेटम द्यायचा तो घरातल्यांना द्या”; अजित पवारांनी राज ठाकरेंना फटकारलं

मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, एअर इंडियानंतर ‘ही’ कंपनीही विकली

मोठी बातमी! कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अत्यंत महत्वाची माहिती समोर