Loading...
औरंगाबाद मुंबई

जैन समाजाचं कौतुकास्पद पाऊल.. महावीर जयंतीचा कार्यक्रम रदद् करून कोरोनाच्या उपचारासाठी निधी

औरंगाबाद | राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. शनिवारी दिवसभरात 12 रूग्णांची भर पडून ही संख्या आता 31 वर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर जैन समाजाने मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षीचा महावीर जयंतीचा कार्यक्रम रद्द करून जैन समाज कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी निधी देणार आहे.

दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये औरंगाबादेत महावीर जयंतीचा कार्यक्रम पार पडतो. मात्र यंदाच्या जयंतीवर कोरोनाचं सावट असल्याने जयंतीचा कार्यक्रम रद्द करून तोच निधी कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय जैन समाजाने घेतला असल्याची माहिती राजेंद्र दर्डा यांनी दिली आहे.

Loading...

शहरातील शोभायात्रा, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले गेले आहेत. गर्दी टाळण्याचं आवाहन देखील प्रशासनाने केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाना सहकार्य करण्याचं आवाहन जैन समाजाने केलं आहे.

दरम्यान, राज्यातील व्यायामशाळा, चित्रपटगृह, नाटयगृह तसंच शाळा महाविद्यालयं बंद ठेवण्यात आलेले आहेत. तसंच कोरोनाग्रस्तांच्या उपचाराचा खर्च राज्य शासनाने देखील उचलला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-कोरोनामुळे होतायेत पाळीव प्राणी बेघर

-“ठरलेल्या तारखेसच होणार सर्व बोर्डांच्या व विद्यापीठांच्या परीक्षा”

-षटकार तर मारला आता चेंडू कोण शोधणार? फिल्डर बॉल शोधून शोधून दमले

-धोक्याची घंटा; कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात!

-आम्ही अगदी सेम टु सेम कॉपी… फडणवीसांसोबतचा टिकटॉक व्हिडीओ होतोय व्हायरल

Loading...