देश

‘अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली’; शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप

anuj sharma

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेले मेजर अनुज सूद अनंतात विलीन झाले.

शहीद मेजर अनुज सूद यांच्या अंत्यसंस्कारासाठी ब्रिगेडियर पदावरुन निवृत्त झालेले त्यांचे वडील सीके सूद, वीरमाता सुमन सूद आणि वीरपत्नी आकृती सूद उपस्थित होत्या. अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली आहे. बेटा, तुला सलाम! असे उद्गार यावेळी त्यांच्या पित्याने काढले आहेत.

हिमाचल प्रदेशातील कांग्रा येथे राहणाऱ्या आकृती यांच्याशी तीन महिन्यांपूर्वी मेजर अनुज सूद विवाहबद्ध झाले होते. आकृती सूद सध्या पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात.

दरम्यान, अनुजच्या बलिदानाचा मला अभिमान आहे. तो नेहमीच माझ्यासोबत राहील, अशा भावना त्यांची पत्नी आकृती सूद यांनी अखेरचा निरोप देताना व्यक्त केल्या.

महत्वाच्या बातम्या-

-दारूची होम डिलिव्हरी मिळणार; ‘या’ सरकारनं घेतला निर्णय

-मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण; राज्यभरात 457 पोलिसांना कोरोना

-ड्युटीवर असुरक्षित वाटत असल्यानं IAS अधिकाऱ्याचा राजीनामा

-अंबानी कुटुंबाने खूप मदत केली, त्यांच्या मदतीशिवाय हा प्रवास पूर्ण झाला नसता- नीतू कपूर

-“इस्रायल कोरोना विरोधात लस निर्मितीपासून काही पावलं दूर”