महाराष्ट्र मुंबई

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कौतुकास पात्र, माझा त्यांना सलाम”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार फेसबुकवरुन संवाद साधत लोकांना संयम राखण्याचं आवाहन करत महत्त्वाचे निर्णय आणि सूचनांची माहिती देत आहेत. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहे त्याचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही उद्धव ठाकरे कौतुकास पात्र असल्याचं सांगत त्यांना सलाम केला आहे. जावेद अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचं कौतूक केलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोना व्हायरसंबंधी स्पष्ट निर्देश देत परिस्थिती हाताळत आहे ते कौतुकास पात्र आहे. माझा सलाम, असं जावेद अख्तर म्हणाले आहेत.

दरम्यान, फक्त सर्वसामान्य नाही तर सेलिब्रेटीही जाहीरपणे उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या –

-1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

-‘धनंजय मुंडे कळवा, हजार रुपये मिळवा’; सुरेश धस यांची घोषणा

-कोरोनाविरुद्ध लढणाऱ्यांना ‘येवले अमृततुल्य’तर्फे तरतरी देण्याचं काम

-“धार्मिक कार्यक्रमांसाठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा”

-धारावीत कोरोनाचा चौथा रुग्ण आढळला; मुंबईसाठी धोक्याचा इशारा