महाराष्ट्र मुंबई

तिसरीत शिकणाऱ्या श्रेयाचं अक्षर पाहून जयंत पाटील भारावले; केलं तोंडभरून कौतुक

मुंबई | तिसरीत शिकणाऱ्या श्रेया सजन या मुलीचे सुंदर हस्ताक्षर असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी या मुलीची दखल घेतली असून तिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

प्रिय श्रेया, तुझे खूप खूप अभिनंदन! तुझे हस्ताक्षर स्पर्धेतील लिखाण सोशल मीडियावर पाहिले आणि तुझे खुप कौतुक वाटले. तुझे वळणदार आणि सुंदर असे हे हस्ताक्षर जरूर जप. तुझ्या भावी शैक्षणिक कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा!, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तिसरीच्या इयत्तेत शिकणारी श्रेया सजन हिने जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत हे लिहिलं आहे. तिचे हे अक्षर पाहून अनेकांनी तिचे कौतुक केलं आहे.
दरम्यान, श्रेयाच्या वडिलांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. श्रेयाचे वडील शिक्षक आहेत. ते दररोज एक पान तिच्याकडून लिहून घेत असतात.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजप वैचारिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर… त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळले नाहीत- जयंत पाटील

-मायाळू मंत्री बच्चू कडूंनी ‘राहुटी’त ऐकल्या चिमुकल्याच्या मागण्या!

-“चंद्रकांतदादा, मध्यावधी निवडणूक लागली तर तुम्ही कुठून लढणार पुणे की कोल्हापूर??”

-आरोपीने जसा गुन्हा केलाय तशीच शिक्षा त्याला व्हायला हवी- रूपाली चाकणकर

-उद्धवजी, आपल्यातील भांडणं विसरून महिला सुरक्षेविषयी कठोर निर्णय घ्या- अमृता फडणवीस