महाराष्ट्र मुंबई

भाजप वैचारिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर… त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळले नाहीत- जयंत पाटील

मुंबई |  राज्य सरकारने वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटला जालना जिल्ह्यात 51 हेक्टर जमीन दिली आहे. यावरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवार हे या संस्थेशी संबंधित असून त्यामुळेच सर्व नियम डावलून हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. याच पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपला चांगलंच सुनावलं आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर भाजपाकडून केली जाणारी टीका हास्यास्पद आहे. दुर्दैवाने भाजपाला अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्नच कळले नाहीत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला दिलेल्या जागेच्या निर्णयाबाबत राज्य सरकार ठाम आहे. भारतीय जनता पक्ष वैचारिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे..

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही ऊस संशोधन करणारी नामवंत संस्था आहे. आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जालन्यात ऊस संशोधन केंद्र निर्माण केले जाईल. कमी पाण्यात ऊस उत्पादन करण्यासाठी संशोधन केले जाईल, दुष्काळावर मात करणारा ऊस निर्माण केला जाईल. ज्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात फायदा होईल, असं पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, ऊस संशोधनासाठी ही जमीन वापरण्यात येणार असल्याने नियमांना बाजूला सारून हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारने सांगितलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-मायाळू मंत्री बच्चू कडूंनी ‘राहुटी’त ऐकल्या चिमुकल्याच्या मागण्या!

-“चंद्रकांतदादा, मध्यावधी निवडणूक लागली तर तुम्ही कुठून लढणार पुणे की कोल्हापूर??”

-आरोपीने जसा गुन्हा केलाय तशीच शिक्षा त्याला व्हायला हवी- रूपाली चाकणकर

-उद्धवजी, आपल्यातील भांडणं विसरून महिला सुरक्षेविषयी कठोर निर्णय घ्या- अमृता फडणवीस

-हिंगणघाटच्या राक्षसाला ‘हैदराबाद’सारखा न्याय द्या- प्रणिती शिंदे