Top news महाराष्ट्र मुंबई

“लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी समजला का? जयंतरावांनी मोदींवर केलेली टीका योग्यच”

मुंबई |  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका योग्यच आहे, असं शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. आजच्या सामनाच्या आग्रलेखातून त्यांनी नरेंद्र मोदी यांना टोले लगावले आहेत.

जयंत पाटील यांनी मोदींवर केलेली टीका योग्यच आहे. त्यांचं मोदींवर भडकणं म्हणजे ही जनभावना आहे. मोदींच्या भाषणानंतर सगळ्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मोदींचा बंद म्हटल्यावर दुध, पाणी, औषध, अन्नधान्यचे काय याबाबत लोकांमध्ये संभ्रम होता. लोकांनी घाबरून रस्त्यावर गर्दी केली. जयंत पाटील यांनी लोकांच्या याच संभ्रमावस्थेवर बोट ठेवले, असं आजच्या सामनामधून संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Loading...

नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक फैलावू नये त्यासाठी देशभर लॉकडाऊनची घोषणा केली. रात्री 8 वाजता त्यांनी देशवासियांशी संवाद साधताना बंदची घोषणा केली.  मोदींच्या देशवासियांना उद्देशून केलेल्या संबोधनाचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी जोरदार समाचार घेतला. जगभरातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा विचार करता, देशातील लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते. लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे, अशी टीका करत सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, गोरगरिबांच्या पोटापाण्याची सोडय मोदींनी लावायला पाहिजे होती, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच राज्यातील अन्नधान्याचा साठा मोठा आहे तसंच जनतेने घाबरण्याची गरज नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

-सॉरी उद्धवजी… मला तुमची माफी मागायचीय; मुख्यमंत्र्यांकडे अभिनेत्याचा माफीनामा

-गरिबांना तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप होणार- निर्मला सीतारामन

-कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, खपवून घेतलं जाणार नाही- धनंजय मुंडे

-घरात येणाऱ्या माशांपासूनही कोरोना होऊ शकतो- अमिताभ बच्चन

-गोरगरीबांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली ‘इतक्या’ हजार कोटींची घोषणा