दादा नाराज नाहीत, शरद पवार कुटुंबप्रमुख आहेत त्यांना प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार- जयंत पाटील

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना फटकारल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. शरद पवार पार्थ पवार यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना कुटुंबातील प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार आहे. त्यात वावगं असं काही नाही. त्यामुळे याबाबत अधिक चर्चा करण्याची आवश्यकता नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

आमची सिल्व्हर ओकवर ठरलेली बैठक होती. पार्थ संबंधित कोणताही विषय चर्चेत आला नाही. पार्थ यांचं विधान त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. पण याबाबत कोणताही कौटुंबिक वाद नाही. पवार कुटुंबात कोणतेही वाद नाही, असंही पाटील यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अजित पवार नाराज नसल्याचंही सांगितलं.

दरम्यान, सिल्व्हर ओक’वरील बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मात्र अजित पवार कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले.

महत्वाच्या बातम्या-

दादा नाराज नाहीत, शरद पवार कुटुंबप्रमुख आहेत त्यांना प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार- जयंत पाटील

“भारतीय संघाच्या ‘या’ यष्टीरक्षकाच्या बायकोनं विराटला तंदरुस्त राहण्यासाठी केलं होतं प्रोत्साहित”

‘पार्थच्या बोलण्याला आपण कवडीची किंमत देत नाही’; आजोबांच्या तिखट प्रतिकियेवर पार्थ पवार म्हणाले…

तैमुर होणार दादा! सैफच्या घरी ‘कोणीतरी येणार येणार गं’; करीनाकडून पुन्हा एकदा गुड न्युज

गोड बातमी! मुंबईतील कोरोना संक्रमण नियंत्रणात येत आहे; कोविड सेंटरमधील तब्बल इतक्या हजार खाटा रिकाम्या