अशा वेळीही तुम्हाला राजकारण सुचतंय, याचं मला कौतुक वाटतं; जयंत पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला

मुंबई  | भाजपचे हजारो कार्यकर्ते आज राज्यभर जीव तोडून मदत कार्य करत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची लोकं मदतकार्यात कुठं आहेत? असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांंवर निशाणा साधला होता. त्यांच्या याच टीकेला आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत असतील तर आनंदच आहे. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय काम करत आहेत हे बघायचे असल्यास राष्ट्रवादीचं फेसबुक व ट्विटर हॅन्डल वारंवार पाहण्याची सवय लावून घ्या, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन काय काम करत आहेत, हे आपल्याला दिसेल, असं प्रत्युत्तर त्यांनी चंद्रकांतदादांना दिलं आहे.

चंद्रकांतदादा, सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आहेत. सर्व लोक त्यांना सहकार्य करत आहेत. अशा वेळी तुम्हाला राजकारण सुचते, याचे मला कौतुक वाटते, असा टोला त्यांनी पाटील यांना लगावला आहे.

दादा, कोरोना आजाराचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका उद्भवतो. त्यामुळे, आपण जास्त बाहेर फिरू नका. स्वतःची काळजी घ्या. काही कमी जास्त लागल तर कळवा. मी आहेच ना आपल्या मदतीला.. आपलाच जयंत पाटील, असा चिमटा देखील त्यांनी काढला आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-…तर भारतात आठ लाख लोकांना झाली असती कोरोनाची लागण!

-इथेही राजकारण?… पी. एम. केअरमध्ये जास्त निधी येण्यासाठी मोदींची चाल

-मुख्यमंत्री महोदय कोण करतय राजकारण; निलेश राणेंचा सवाल

-सरकारला माझी मदत लागली तर मी नक्कीच देशात परतून काम करेल- रघुराम राजन

-“पंतप्रधान निधीसाठी डीडी नॅशनलवर जहिरात होतीये मग मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी का होऊ नये”