मराठी युवकांकडे कौशल्य नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना जयंत पाटलांचं सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई |  महाराष्ट्रातील युवकांकडे आवश्यक ती सर्व कौशल्य आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी इथल्या युवकांना कमी लेखू नये, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.

परप्रांतीय मजूर सध्या कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे आपापल्या राज्यात गेले आहेत. अशावेळी इथे अनेक क्षेत्रांमध्ये कामगारांची उणीव भासते आहे. मात्र परप्रांतीयांची जागा घ्यायला मराठी युवकांकडे तेवढं कौशल्य नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा जयं पाटील यांनी समाचार घेतला आहे.

जे मजूर गेले ते परत येतील, त्यांचे स्वागत आहे. पण मोदींनी राबवलेला ‘स्कील इंडिया’ महाराष्ट्रात फेल गेले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, आणि याचं उत्तर फडणवीसांनी दिलं तर बरं होईल, असं ते म्हणाले.

जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “महाराष्ट्रातील युवकांकडे आवश्यक ती सर्व कौशल्य आहेत. फडणवीस साहेब यांनी इथल्या युवकांना कमी लेखू नये. जे मजूर गेले ते परत येतील, त्यांचे स्वागत आहे. पण मोदींनी राबवलेला ‘स्कील इंडिया’ महाराष्ट्रात फेल गेले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे”.

महत्वाच्या बातम्या-

-फडणवीसजी, महाराष्ट्रापेक्षा गुजरातची अवस्था बिकट आहे- जयंत पाटील

-…म्हणून रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुलट सोडल्या- अनिल परब

-खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण- देवेंद्र फडणवीस

-भाजप महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू?- जयंत पाटील

-‘फडणवीसांची आकडेवारी आभासी’; फडणवीसांच्या दाव्याची ठाकरे सरकारकडून पोलखोल