गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांचे आभार मानण्याची वेळ आली!

मुंबई | महात्मा गांधींची हत्या हे भारतातील पहिलं दहशतवादी कृत्य असून शरद पोंक्षे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कसलाच संबंध नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पोंक्षे पक्ष कार्यालयात आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पक्षावर टीकेची झोडही उठवली जात होती. अखेरीस ट्विट करत जयंत पाटलांनी याबाबत खुलासा केला. जयंत पाटील म्हणतात, “गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार, हेदेखील निश्चितच विकृत विचार आहेत, अशी माझी ठाम धारणा आहे.”

“राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे पक्ष कार्यालयात आले होते. यापलीकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल.”

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गांधीवादी विचारांचा पक्ष आहे. गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे.” असं ट्विट करत त्यांनी सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-आमच्या औषधाने फक्त तीनच दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होणार; बाबा रामदेव यांचा दावा

-जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण

-ते रहस्य तुझ्यासोबतच निघून गेलं; ‘या’ अभिनेत्रीने सुशांतसाठी लिहिली पोस्ट

-“आज गौप्यस्फोट करतोय; अजित पवारांआधी थेट राष्ट्रवादीची ऑफर होती”

-नगरमध्ये भाजपचा खासदार असताना सुजय विखेंना तिकीट का दिलं?; फडणवीस म्हणतात…