तंत्रज्ञान

15 ऑगस्टच्या मुहूर्तावर भारतीय ग्राहकांसाठी ‘जिओ’चा मोठा धमाका

Neeta Ambani

मुंबई : येत्या 15 ऑगस्टला रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना मोठं गिफ्ट देणार आहे. जिओचा जिओ फोन 2 लॉन्च करण्यात येणार आहे.

जिओ फोन 2 मध्ये अनेक नवे फिचर्स आहेत. हा फोन 4G असणार आहे. तसंच या फोनमध्ये व्हॉट्सअॅपची सुविधाही असणार आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फोनची किंमत फक्त 2 हजार रुपये असणार आहे. या फोनमध्ये 2000 एमएएचची बॅटरी, फिजीकल कि-पॅड, VoLTE,  FM रेडिओ, 512MB RAM आणि 4 जीबी डाटा स्टोर करता येणार आहे.

दरम्यान, फोनची ऑनलाईन बुकिंग 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. हा फोन घेण्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा देण्यात आलेली नाही. 

जिओच्या अधिकृत वेबसाईट किंवा जिओच्या अॅपवरुन हा फोन बुक करता येणार आहे.