पुणे महाराष्ट्र

देशाचे पंतप्रधान गांधीजींसमोर नतमस्तक होतात पण…- जितेंन्द्र आव्हाड

पुणे | 150 व्या गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम चक्क एका हिंदुत्त्ववादी संघटनेच्या दबावामुळं रद्द करावा लागल्याची धक्कादायक घटना पुरोगामी म्हणवणाऱ्या पुण्यात घडली. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशाचे पंतप्रधान गांधीजींसमोर नतमस्तक होतात पण पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात तुषार गांधींच्या कार्यक्रमाला काही संघ विचारांच्या संघटना विरोध करतात ही अत्यंत लाजिरवाणी घटना आहे, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केला आहे.

Loading...

पुणे पोलिसांनी अशा घटनांकडे यापुढे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाडांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

दरम्यान, मी हजर राहिलो तर कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा पतितपावन संघटनेनं दिला आहे. गोली मारो गँग पुन्हा सक्रीय झाली आहे, असं तुषार गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

-मनसेत इनकमिंग सुरू; दोन दिग्गज नेत्यांनी केला प्रवेश

-मी महाराष्ट्राची लेकय; घाबरणारही नाही आणि गप्पही बसणार नाही- मानसी नाईक

-मुख्यमंत्रीसाहेब, तुम्हाला लाज वाटायला हवी- राजू शेट्टी

-मनसेत प्रवेश करताच जाधवांची गर्जना; ‘आता चंद्रकांत खैरे खासदार होणे नाही…!’

-दिल्लीचा गड आम्हीच जिंकणार; भाजपच्या मनोज तिवारींचा दावा!