भाजपवाल्यांनो, मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच मरणार; जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

मुंबई |  काल पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर अनेकांनी मला तबलिकीमध्ये जाण्याचा सल्ला दिला. अनेकांनी पातळी सोडून टीका केली. मात्र मी जन्माने हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच मरणार, असं सणसणीत प्रत्युत्तर त्यांनी टीकाकारांना दिलं आहे. भाजपच्या प्रसाद लाड यांनी आव्हाडांना तबलिकीमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता.

जेव्हा जे बोलायचं असतं ते मी बोलतो. मी दलालीच्या धंद्यात नाही. उपाशी मरेल पण मी माझ्या निष्ठा गहान ठेवणार नाही. निष्ठेत कधीही तडजोड करणार नाही. मशीदीला लॉक लावलं पाहिजे, हे पहिल्यांदा मी म्हटलं. मुम्ब्र्यात आर्मी आली पाहिजे हे मी कमिशनरांविरोधात जाऊन सांगितलं. हिंदू वस्तीत आणि मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन मी जनजागृती केली. माणसं मरतायेत. ती कोणच्या धर्माची मरतायेत हे बघून जर आपण आपलं काम ठरवणार असू तर मात्र अवघड आहे. प्रश्न हिंदू-मुस्लिमांचा नाहीये. प्रश्न मानवतेचा आहे. कोरोना आलाच आहे तीच मानवता बघण्यासाठी, अशा शब्दात टीकाकारांचा आव्हाडांनी समाचार घेतला.

महाराष्टाच्या सरकारने वसईत होणाऱ्या मरकजला परवानगी नाकारली. आम्ही सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला कडाडून विरोध केला. मात्र दिल्लीमध्ये तो कार्यक्रम पार पडला. अमित शहांनी कशी काय परवानगी दिली?, असा सवालही त्यांनी विचारला.

मी हिंदू आहे याचं सर्टिफिकेट मला स्वत:ची विक्रीव्यवस्था करणाऱ्यांनी देऊ नये. मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच मरेल. मला कुणी अक्कल शिकवू नये, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या –

-लॉकअपमधून बाहेर, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अरुण गवळीचा ‘कॅरम’गेम; पाहा व्हीडिओ

-“महाराष्ट्रातील लॉकडाउनचा कालावधी ‘इतक्या’ दिवसांनी वाढवला जाऊ शकतो”

-एका विषाणूसमोर गुडखे टेकणाऱ्यांपैकी आपण नाही, आत्मविश्वासाने लढू आणि जिंकू- उद्धव ठाकरे

-मी माझ्या महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवेन पण तुम्हाला सोडणार नाही- उद्धव ठाकरे

-निवडणूक आयोगाचा आदेश जारी; महाविकास आघाडीचं सरकार संकटात!