सोलापूरचे पालकमंत्री बदलले; वळसे पाटलांऐवजी राष्ट्रवादीच्या या नेत्याची लागली वर्णी

सोलापूर |   ऐन कोरोनाच्या धामधुमीत सोलापूरचे पालकमंत्री बदलण्यात आलेले आहेत. मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून सोलापुरचे पालकमंत्री पद काढून घेण्यात आलं आहे. सोलापुरचं पालकमंत्रीपद आता जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आलं आहे.

दिलीप वळसे पाटील हे पालकमंत्री झाल्यापासून एकदाच सोलापुरला आले होते. अनेकदा त्यांच्या कामामुळे त्यांना सोलापुरला यायला जमत नव्हतं. त्यामुळे त्यांच्यावर सोलापुरकरांची नाराजी होती. याच कारणाने आव्हाडांकडे आता सोलापुरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

वळसे पाटील यांच्या सोलापुरला न येण्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा भडीमार हा अधिकारी वर्गावर होत असे. त्यामुळे सोलापुरकरांमध्ये पालकमंत्र्यांविषयी रोष होता. साहजिच राज्य सरकारने वळसे पाटील यांच्याकडून सोलापुरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी काढून घेतली.

दरम्यान, आव्हाड यांच्या रूपाने आता सोलापुरला पूर्णवेळ पालकमंत्री मिळाले आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर आव्हाडांकडे कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी नव्हती मात्र 3 महिन्यातच त्यांच्यावर आता नवी जबाबदारी पडली आहे. कोरोनाचा वाढता विळखा पाहता आता आव्हाडांची नव्या शहरात कसोटी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

-लॉकडाउनला ठेंगा! भाजप आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न

-ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या वेतनात होणार ‘इतकी’ कपात

-मी अनेकदा बँकांना सर्व पैसे देण्याची ऑफर दिली होती पण…- विजय मल्ल्या

-“असंही एक दिवस मरणारच आहोत, त्यासाठी देश लॉकडाऊन करू शकत नाही”

-“मोदीजींना स्वतःबद्दल गैरसमज आहे त्यांना देश समजला नाही… त्यामुळे माफी मागून काहीही फरक पडणार नाही”